Saturday 22 September 2018

हिंदू धर्म आणि वैदिक धर्माचा इतिहास - धार्मिक इतिहासाची समतोल मांडणी


आपण कोठून आलो? आपला इतिहास काय? आपल्या संस्कृतीचा उगम कसा झाला? आपण आर्य आहोत का? आपल्याला वेदांचा अधिकार होता का? आपली मूळ भाषा कोणती? आपले आद्य पुरुष कोण? असे अनेक प्रश्न मानवी मनाला भेडसावत असतात. प्रत्येक जण आपापल्या परीने या प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न करत असतो. पण प्रत्येकालाच याचं समाधानकारक उत्तर मिळत नाही. प्रसिध्द विचारवंत संजय सोनवणींचा 'हिंदू धर्म आणि वैदिक धर्माचा इतिहास' हा ग्रंथ असे अनेक प्रश्न निर्माण करून त्यांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करतो.

आपल्या मनातील प्रश्नांची उकल करण्याबरोबरच आजवरच्या सर्वच प्रचलित समजांना छेद देण्याचं कामदेखील हा ग्रंथ करतो. हिंदू धर्म हा वैदिक धर्मापासून वेगळा आहे हा या ग्रंथाचा गाभा आहे. मागील बऱ्याच वर्षांपासून सोनवणी समांतर मांडणी करत आहेत. त्यावरून त्यांची बरीच हेटाळणी झाली. हिंदू धर्मात फूट पाडणारा व्हॅटिकनचा एजंट असा गंभीर आरोपदेखील त्यांच्यावर झाला. इतक्या टोकाची टीका होऊनदेखील सोनवणींनी आपलं संशोधन पूर्ण करत हा ग्रंथ सिध्द केला. अपेक्षेप्रमाणे अनेकांनी तो न वाचताच त्यावर टीका करणं पसंत केलं.

आपला इतिहास अनेक तुकडयांमध्ये विभागला आहे. उपलब्ध असलेला तोकडा इतिहासदेखील मिथकांनी आणि आख्यायिकांनी भरलेला आहे. त्यातील सत्यता पडताळण्याचं कोणतंही ठोस परिमाण आपल्यापाशी नाही. काही ठिकाणचे शिलालेख, ताम्रपट, वेद, श्रुती, स्मृती, पुराणं, उपनिषदं इत्यादींच्या आधारे त्याचे काही संदर्भ जुळवता येतात. या कारणांनी साहजिकच त्याचे उलटसुलट अन्वयार्थ लावणं तुलनेने सोपं जातं. या साधनांवर सुरुवातीपासूनच एका विशिष्ट वर्गाचं वर्चस्व राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी लावले ते अर्थ प्रमाण मानले गेले.

परंतु जसा काळ बदलला, तशी या संसाधनांवरची विशिष्ट वर्गाची मक्तेदारी मोडीत निघाली. त्यांनी घालून दिलेल्या मिथकांची उलटतपासणी झाली आणि नवीन सिध्दान्त, नवीन मांडण्या पुढे येऊ लागल्या, ज्या या पूर्वापार चालत आलेल्या समजांच्या पूर्णच विरुध्द जाणाऱ्या होत्या. काही सिध्दान्त तर केवळ त्या विशिष्ट वर्गाप्रतीच्या द्वेषभावनेतून मांडले गेले. आधीच गढूळ असलेला इतिहास आणखीन गढूळ झाला. अशा पार्श्वभूमीवर प्रचलित समजांना छेद देत, परंतु कोणत्याही घटकाविषयी द्वेषभावना निर्माण न करता समतल मांडणी करण्यात संजय सोनवणी बऱ्याच अंशी यशस्वी झाले आहेत.

या ग्रंथात सोनवणींनी इतर विद्रोही मांडण्यांप्रमाणे हवेतून संदर्भ न देता जागोजागी विश्वासार्ह भाषाशास्त्रीय, वंशशास्त्रीय, भौगोलिक, ऐतिहासिक, धर्मशास्त्रीय संदर्भ दिले आहेत.

आर्य बाहेरून - म्हणजेच युरेशिया नामक कुठल्यातरी प्रांतातून आले आणि त्यांनी आमच्यावर त्यांची मनुस्मृती, जातिव्यवस्था लादली आणि राज्य केलं ही मूलनिवासी चळवळीची आवडती थियरी सोनवणी सप्रमाण खोडून काढतात.

त्याचबरोबर जातिव्यवस्था ही जन्माधारित नसून ती व्यवसायाधारित होती. कोणताही व्यक्ती मुक्तपणे व्यवसाय बदल करू शकत असे, तसेच वरचेवर नवीन जाती/व्यवसायदेखील बनत असत. परंतु दहाव्या शतकानंतरच्या सततच्या दुष्काळामुळे उत्पन्नात घट झाली आणि पुढे हीच मुक्त व्यवसाय पध्दती पुढे बंदिस्त झाली. पुढे याचं पर्यवसान बंदिस्त जातिव्यवस्थेमध्ये झालं हेदेखील पुराव्यानिशी दाखवून देत 'ब्राह्मणांनी जातिव्यवस्था लादली' या आरोपातून ब्राह्मणांना मुक्त करतात.

हिंदू धर्म हा वेदांवर आधारित नसून तो शिव-शक्तिपूजक आणि तांत्रिक आहे, हे सोनवणी ठासून सांगतात. एकूणच आपल्या जीवनावर तंत्रांचा असलेला प्रभाव पाहता त्यांचा हा दावा सत्य वाटतो. हिंदू देवता शिव ही वेदबाह्य असून वेदात अनेक ठिकाणी शिवाला यज्ञाचा विनाशक असंही संबोधल्याचे ते दाखले देतात. त्याच्याही पुढे जाऊन आद्य शंकराचार्यदेखील वैदिक नसून हिंदू आहेत हे सांगतात. ॠग्वेद आणि अवेस्ता या दोन धार्मिक ग्रंथांतील अनेक श्लोकांतून आणि भौगोलिक साधर्म्यातून या दोन धार्मिक ग्रंथांतील साधर्म्य दाखवून दिलं आहे. त्यातून ॠग्वेदाची रचना भारतात झाली नसून ती मध्य आशियात कुठेतरी झाली असावी, असा ते दावा करतात.

रामायण व महाभारत ही दोन्ही महाकाव्यं वेदपूर्व आहेत आणि त्यांचा वैदिकांशी काहीही संबंध नाही, याचे अनेक पुरावे त्यांनी या ग्रंथात उद्धृत केले आहेत. तसेच उपनिषदं हे वेदांचं सार अथवा शेवट नसून वेदांचा अंत आहेत. म्हणजेच उपनिषदं ही वेदानुकूल नसून ते वेदविरोधी आहेत या बाबासाहेबांच्या आणि मॅक्स मुल्लरच्या मांडणीशी सहमती दर्शवतात.

बळी, नरकासुर, रुद्र, कौटिल्य, तंत्र, सांख्य, मनुस्मृती, संस्कृत भाषा या अशा अनेक विषयांबद्दलच्या आजवर ऐकलेल्या-वाचलेल्या पूर्वकल्पनांना हा ग्रंथ धक्का देत तथ्यांच्या आणि पुराव्यांच्या आधारे संपूर्ण नवीन मांडणी करतो. आपल्या संस्कृतीची, इतिहासाची पाळंमुळं शोधू इच्छिणाऱ्या, चिकित्सक वृत्तीच्या सर्व वाचकांनी हा ग्रंथ आवर्जून वाचावा असा आहे.

पुस्तकाचे नाव - 'हिंदू धर्म आणि वैदिक धर्माचा इतिहास'
लेखक - संजय सोनवणी
प्रकाशक - प्राजक्त प्रकाशन
पृष्ठसंख्या - 331
मूल्य - रु. 320/-


सदर लेख साप्ताहिक विवेक मध्ये पूर्वप्रकाशीत आहे.
http://www.evivek.com/Encyc/2018/9/22/Hinduism-andHistory-of-Vedic-religion
© अक्षय बिक्कड

Friday 15 June 2018

Understanding communist conspiracy, Penetrating ‘Ambedkarite’ Movement.

Roots and international expansion
Everyone is aware of the origin and roots of communism. Communism was proposed by German ideologue Karl Marx and Fredric Angels back in 1848 by publishing “The communist manifesto”. Communism was born due to the industrial revolution that was started in Britain and spread all over Europe and Russia in relatively short spam. Due to the industrial revolution and lack of labor laws, there was a feeling of umbrage in the labors. Marx was heavily benefited by the discontent among the labors and peasants working in factories. Pitch was ready for the communists and they became successful in transforming Russia into a red nation. Did labors get their cut or not is a secondary question though.
Once a recipe is successful in one place people tend to experiment in different places. Just like that after the successful inception of a red flag in Russia comrades flew in other parts of the world with the constitution of their ‘-ism’. In few countries, they were successful where there was kind of similar conditions. But the problems grew when comrades swore to convert blue planet into a red one.

Entry in India
When comrades approached India for the expansion of their –ism, they initially targeted their most suitable and easy target, labor movement of mill workers in Mumbai. Unlike Russian labor revolution, they couldn’t prevail and sequenced into the ax of unemployment on the mill workers, which resulted in completely destroying their fortune. After the unsuccessful attempt of inception in India with the labor rebel, comrades started to find new hosts for survival. Their cunning eye went on the backward, abandoned aboriginal tribes.
Extermination of tribal movement and rise of ‘Naxalism
After losing credibility of the Indian mill workers commies swiveled their guns towards the abandoned and ignored tribes in the forests. Ignorance of the government and lack of interest of the society towards the tribal welfare was on the fortune of the communists. Hence they could get through support from the tribes. They brought the tribes to faith that the government has always failed or has no interest in their welfare hence they need to rebel against the government. And this was the first time when “laal salaam” echoed in the forests of India.
That was a kick start. Then there was no looking back. For about 60 years communists fooled the tribes that they are their messiah and are here for their uprising. With the help from some capitalists and NGOs communists kept the forests burning. After the intervention of other political and social powers, this conspiracy was brought into the light. But it left the huge scares on the ‘Adiwasi Movement’. It couldn’t affect us as it was very much limited by the government, security forces and the ‘adiwasis’.
Now there is somewhat hope of bringing those backward and exploited tribes into the mainstream. But still, the big challenge to extricate the tribal youth from the ghettos of Naxalites.

Eying to hijack “Ambedkarite Movement”
After the several unsuccessful attempts to pierce their feet in Indian soils comrades were in search of new pabulum. Their astute acumen went on ‘dalit movement’, which seemed to be scattered after the demise of ‘Namdeo Dhasal’ and schism in ‘Republican Party’. This is the biggest and real threat of the communists to Indian society to misguide the ‘Ambedkarites’. What it looks ostensibly is really alarming to all of us believing in democracy.
For consideration of why this happened?
The answer lies in the feeling of discomfort in ‘dalits’ roused due to racial hierarchy. This gap of miscommunication between the upper class and Dalits is being filled presto by communists. The biggest irony is that Dr. Ambedkar always opposed communism. In his speech in Nepal, he condemned communism and advocated his followers not to get into the clutches of the communists.
Another significant angle is blind following of the Dalit activists towards their leaders. Many of the Dalits blindly follow those who politicize Ambedkar.
To overcome this lapse RSS (Rashtriya Swayamsevak Sangh) is rushing to adopt Ambedkar. This was the main reason of restlessness of RSS on 125th birth anniversary year. It was widely celebrated by the Sangh Parivar in order to rapport with Dalits. The action was not much delayed as the significant destruction was yet to be done.
This is the time when we all those believe in democracy need to join our hands to bring the Dalit community into the mainstream to fight with the foreign powers which intend to break India. Unlike the tribal, we can’t afford to lose one of an integral part of our society. Let’s unite and vanquish red malady.
Here’s what Dr. Ambedkar said about the Communists and Socialist. An excerpt from his speech-
The condemnation of the Constitution largely comes from two quarters, the Communist Party and the Socialist Party. Why do they condemn the Constitution? Is it because it is really a bad Constitution? I venture to say no’. The Communist Party want a Constitution based upon the principle of the Dictatorship of the Proletariat. They condemn the Constitution because it is based upon parliamentary democracy. The Socialists want two things. The first thing they want is that if they come in power, the Constitution must give them the freedom to nationalize or socialize all private property without payment of compensation. The second thing that the Socialists want is that the Fundamental Rights mentioned in the Constitution must be absolute and without any limitations so that if their Party fails to come into power, they would have the unfettered freedom not merely to criticize, but also to overthrow the State. 
  – Dr.B. R. Ambedkar
Where there is discontent, there are communists

(The Article was originally Published on MYvoice a community driven chapter of Opindia.com)

Sunday 10 June 2018

जंगलातल्या प्रकाशवाटा..!

संपूर्ण महाराष्ट्राला वेठीस धरणाऱ्या कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या मागे नक्षलवादी शक्तींचा हात असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. त्याच अनुषंगाने पुणे पोलिसांनी कबीर कला मंच व रिपब्लिकन पंथार्सच्या कार्यकर्त्यांच्या घरी धाडी टाकल्या, व त्यात हाती लागलेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी ५ संशयित आरोपींना अटक केली. साहजिकच या अटकसत्रानंतर डाव्या माओवादी गटांत खळबळ उडाली. अपेक्षेप्रमाणे अटकेनंतर काही तासातच विविध भागात निदर्शने, घोषणाबाजी सुरू झाली. आणि पुरोगामी विचारवंतांच्या लोकशाहीची हत्या, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संविधान धोक्यात आहे अशा सारखं ऐकून बोर झालेल्या आरोळ्या कानावर पडल्या.
आम्ही म्हणतो त्याला अटक करा म्हणणारे डावे, त्यांच्यावर चौकशीअंती झालेल्या कारवाईवर आता अरण्यरुदन करत आहेत. ते साहजिक आहे. परंतु माओवाद्यांच्या या अटकेने मिलिंद तेलतुंबडेला झालं नसेल त्यापेक्षा जास्त दुःख प्रकाश आंबेडकरांना झालं आहे. प्रकाशरावांच्या मागच्या काही वर्षातल्या भूमिका पहिल्या तर एक गोष्ट लक्षात येईन टी म्हणजे त्यांना नक्षलवाद्यांविषयी असलेली सहानुभूती ही नवी नाही. त्यांनी अनेक वेळा जाहीरपणे मावोवाद्याना पूरक भूमिका घेतल्या आहेत. प्रकाश आंबेडकरांनी कम्युनिस्ट पार्टी सोबतही राजकीय युती करण्यास काही हरकत नाही ती त्यांची राजकीय भूमिका आपण समजू शकतो. परंतु देशाच्या अंतर्गत सुरक्षेला सर्वात मोठं आव्हान देणाऱ्या मावोवादी शक्तींशी त्याचं नाव जोडलं जात आहे ह्ये गंभीर आहे. आजवर त्यांच्यावर अनेकवेळा असे आरोप झाले परंतु त्यांनी एकदाही अशा आरोपांचे खंडन केले नाही तर, “हो आहे मी नक्षलवादी काय करायचंय ते करा...!” अशी आडमुठी भूमिका घेतली. एकवेळ मी असंही म्हणेन कि प्रकाशरावांनी तशी भूमिका घ्यायला देखील हरकत नाही, परंतु ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील आंबेडकरी जनतेला त्यांच्या बद्दल आस्था आहे आणि त्यांच्या अशा नक्षलसमर्थक भूमिकेमुळे आंबेडकरी समाजाची दिशाभूल होण्याची शक्यता नाकारता येत नाही,
प्रकाश आंबेडकरांचे मेव्हणे डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्यावर नक्षलवाद्यांच्या फ्रंट ओर्गनायजेशन मध्ये सक्रीय असल्याचे गंभीर आरोप आहेत व तसेच त्यांचे बंधू मिलिंद तेलतुंबडे हे कुख्यात नक्षलवादी आहेत. प्रकाश आंबेडकरांच्या नात्यातील काही लोक नक्षलवादी चळवळीशी संबधित असल्यामुळे त्यांच्यावर संशय घेणं नक्कीच चुकीचं आहे परंतु त्यांच्या एकंदर भूमिका नेहमीच संदिग्ध राहिल्या आहेत.  
२०११ साली महाराष्ट्र पोलिसांनी जेव्हा अन्जेला सोनटक्के, ज्या कुख्यात नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडेच्या पत्नी व मावोवाद्यांच्या महाराष्ट्र स्टेट कमिटीच्या सदस्य आहेत यांना अटक केली होती त्यावेळी प्रकाश आंबेडकरांनी, “सरकार पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून उच्च शिक्षित व्यक्तीला नक्षलवादी ठरवून बदनाम करत आहे.” अशी भूमिका घेतली. त्यावेळ राज्यात कॉंग्रेस राष्ट्रवादी प्रणीत तथाकथित सेक्युलर सरकार होते. अन्जेला ज्या नक्षलवादी चळवळीत कविता, इस्कारा, संगीता, रमा अशा अनेक नावानी परिचित आहेत आणि त्याच्या विरुध्द सबळ पुरावे असताना देखील प्रकाश आंबेडकरांसारख्या जबाबदार व्यक्तीने त्यांची बाजू घेणं नक्कीच आश्चर्यकारक आणि संशयास्पद आहे.
२०१३ साली नक्षलवादाशी संबधित असलेल्या कबीर कला मंच  च्या कार्यकर्त्यांच्या सुटकेसाठी प्रकाश आंबेडकरांनी सरकारला पत्र लिहिलं होतं. ज्यांच्या सुटके साठी सरकारला धारेवर धरलं होतं त्या शीतल साठे आणि सचिन माळी यांच्या जंगलातल्या वावरावर आत्मसमर्पण केलेला नक्षलवादी गोपी याने शिक्कामोर्तब केलं होतं. ज्या कबीर कला मंचच्या नक्षलवादी संबंधावर ATS ने देखील मोहोर लावली आहे त्या KKM बद्दल प्रकाश आंबेडकर म्हणतात, “कबीर कला मंच ला बदनाम करण्याचा हा पोलिसांचा डाव आहे, पोलिसांचे सर्व रिपोर्ट खोटे आहेत, कबीर कला  मंच हा फक्त कलाकारांचा ग्रुप आहे, त्यांचा नक्षलवादाशी संबंध नाही.”
याच्याही एक पाउल पुढ जात २०१३ च्या जून महिन्यात जळगाव मध्ये आयोजित त्यांच्या पक्ष मेळाव्यात, “नक्षलवादी हे देशाचे खरे मित्र आहेत. परंतु सरकार शत्रू समजून त्यांचे म्हणणे ऐकून घेत नाही. नक्षलवाद्यांमध्ये काही बुद्धिवादी लोक आहेत..!” अशा शब्दात नक्षलवाद्यांचे जाहीर समर्थन केले. एवढ्यावर न थांबता ते पुढे म्हणाले कि, “कॉँग्रेसने सलवा जुडूमसारखी संघटना तयार करून 60 हजार नक्षलवादी व आदिवासींना ठार मारले. छत्तीसगड हल्ल्यातील आरोपी मिलिंद तेलतुंबडे हा माझा नातेवाईक आहे, परंतु तो त्याचे काम करीत आहे, मी माझे काम करत आहे.” प्रकाश आंबेडकराच्या अश्या भूमिकांमुळे दलित चळवळ नक्षलवाद्यांकडून हायजक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंबहुना त्यांचा तसा प्रयत्नच सुरु आहे अस म्हणणं वावगं ठरणार नाही.
२०१० साली नागपूर येथे चंद्रपूर पोलिसांनी बंडू मेश्राम आणि रामकुमार अक्कीपल्ली या दोघांना नक्षल संबंध असण्याच्या संशयावरून अटक केली होती त्यावेळी देखील त्यांच्या सुटकेसाठी प्रकाशरावांनी हात पाय मारल्याची चर्चा त्यावेळी माध्यमात रंगली होती.
सध्या अटकेत नक्षलवादाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या सुधीर ढवळे याने राउंड टेबल नावाच्या वेबसाईट ला एक मुलाखत दिली होती त्यात दलित चळवळीवर विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणतो कि, “प्रकाश आंबेडकरांच्या मते दलित चळवळ मृत झालेली आहे, आणि मलाही तसच वाटतं. म्हणून आपण आता नवीन मार्गाचा अवलंब केला पाहिजे.” नवीन मार्ग कोणता हे ढवळे स्पष्ट सांगत नाही परंतु मावोवादी विचार जोपासणाऱ्या ढवळेचा रोख नक्कीच सशस्त्र आणि हिंसकच आहे हे वेगळ सांगायची गरज नाही.
कालच्या तपासात मावोद्यांचा जो पत्रव्यावहार पोलिसांच्या हाती लागला आहे त्यात देखील रोना विल्सन, जिग्नेश मेवानी, उमर खालिद, आनंद तेलतुंबडे यांच्या सोबत प्रकाश आंबेडकर यांचे देखील नाव आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. 
प्रकाश आंबेडकरांच्या या सर्व भूमिका आपण पाहिल्या तर नक्कीच संशयाला जागा आहे. प्रकाश आंबेडकरानी जंगलात जाऊन प्रशिक्षण घेतलं तरी आम्हाला हरकत नाही, परंतु त्यांनी दलित चळवळीला नक्षलवादाच्या दावणीला बंधू नये एवढीच माफक अपेक्षा.
जय भीम
(सदर लेख साप्ताहिक चपराक मध्ये पूर्वप्रकाशित आहे)

Thursday 7 June 2018

या कारवाईने नक्षलवाद संपणार आहे का..?



शहरी नक्षल्यांवर पहिल्यांदाच इतकी कठोर कारवाई झाली आहे याचा आनंद आहे. पण या कारवाईने नक्षलवाद संपणार आहे का..? 
तर याचं उत्तर नकारार्थी आहे, चार दोन नक्षली आत टाकल्याने, त्यांच्यावर खटले भरल्याने नक्षलवाद संपणार नाही. नक्षलवाद हा एक विचार आहे कोणी व्यक्ती नाही. व्यक्ती संपवता येतात पण विचार इतका सहज संपवता येत नाही. आज ढवळे बिवळे आत गेलेत उद्या त्यांच्या जागी दुसरे कावळे येतील पण एक दोन ढवळे आत गेल्याने माओवाद संपणार नाही. त्यांचा एक एक मोहरा आत टाकल्याने ते अजून आक्रमक होतील त्यांच्या विचारांप्रति अजून कट्टर होतील. जर नक्षलवाद मुळातून संपवायचा असेल तर त्याला कारणीभूत असलेल्या आपल्या समाजातील, व्यवस्थेतील त्रुटींना आपण दूर केलं पाहिजे.
कोणी नुसतं माओ मार्क्स वाचून हत्यार हातात घेत नाही. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीवर हा समाज हि व्यवस्था अन्याय करत नाही, त्यांचे हक्क हिरावून घेत नाही तोवर शस्त्र धारण करण्याची कोणाला आवश्यकता वाटत नाही. ज्यावेळी सनदशीर शांततापूर्ण मार्गाने न्याय हक्क मिळत नाहीत तेव्हाच माणूस शस्त्र उचलण्याचा मार्ग निवडतो.
आपल्या समाजात प्रचंड विषमता आहे, सामान्य लोकांना न्याय अजूनही दुरापास्त आहे. न्यायव्यवस्था शासनव्यवस्था कशाप्रकारे श्रीमंतांच्या घरी पाणी भरते हे सगळ्यांना माहित आहे.
स्वतः मी आणि माझा परिवार भ्रष्ट न्यायव्यवस्थेचे बळी आहेत. हक्काच्या गोष्टीसाठी 8 वर्ष न्यायालयात खेटे घालत होतो, पण समोरची पार्टी गडगंज पैसा, राजकीय ताकद बाळगून होती. आई वडील प्रचंड तणावातून जात होते, आर्थिक चणचण भासत होती. घरातील एकेक गोष्ट विकून इकडे तिकडे मिळेल ते काम करून चारितार्थ चालू होता. अनेक नेत्यांना पत्र लिहिली, आपलं सरकार वर तक्रार दिली, मोदींना पत्र लिहिलं पण समोरच्या व्यक्तीची ताकद पाहता कोणीच मध्यस्थी करायला तयार नव्हतं. घरच्यांची अवस्था माझ्याने बघवत नव्हती, कित्येकदा वाटायचं एखादी बंदूक घ्यावी आणि सरळ त्याच्या घरात घुसून गोळ्या घालाव्यात. पण दुसरं मन सांगत होतं हा पर्याय असू शकत नाही, आयुष्यात तुला खूप काही करायचं आहे ते एका गोष्टीसाठी संपवण्यात अर्थ नाही. पण माझ्या कल्पनेत मी त्याला आजवर लाखो वेळा गोळ्या घातल्यात, मागच्या आठ वर्षात एकाही रात्री त्याला गोळ्या घातल्याशिवाय झोपलो नाही.
सांगायचा मुद्दा एवढाच आहे की माझ्या सारखा शिकलेला समतोल विचार करणारा मुलगा जर हातात शस्त्र घेण्याचा विचार करू शकतो तर एखाद्या वस्तीत राहणाऱ्या बेरोजगार तरुणाला शस्त्र उचलायला प्रवृत्त करणं फार अवघड नाही. म्हणून जोवर इथं भ्रष्टाचार आहे, अन्याय आहे तोपर्यंत इथं माओवाद असणार आहे कारण कोणी माओ वाचून माओवादी बनत नाही तर इथली व्यवस्था त्याला माओवादी बनवते. माओ मार्क्स फक्त प्रतीकं म्हणून शिल्लक असतात.
असो 

Tuesday 5 June 2018

पवार साहेबांचं शेतकरी प्रेम..!

फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातीला बळीराजा दुसऱ्यांदा संपावर गेला आहे. चांगल्या नेतृत्वाचा अभाव आणि आंदोलकांमध्ये असलेला कम्युनिकेशन गॅप याच्यामुळे पहिल्या संपातून काही साध्य व्हायच्या आधीच संपाची वांझोटी सांगता झाली. सरकारने संप शमविण्यासाठी अनेक आश्वासनांची खैरात करून शेतकऱ्यांच्या जखमेवर तात्पुरती का होईना फुंकर मारण्याचा प्रयत्न केला. त्यातली सर्वात महत्वाची घोषणा म्हणजे कर्जमाफी. गैरवापर टाळण्यासाठी सरकारने कर्जमाफी योजनेत पात्र होण्यासाठी अनेक किचकट निकष घालून दिले होते.  त्यामुळे अपेक्षित संख्येपेक्षा कितीतरी कमी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. शिवाय कर्जमाफीत कमाल रकमेची मर्यादा देखील घातली होती. यामुळे सरकारने आपली फसवणूक केल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये होती. थोडक्यात पहिल्या शेतकरी संपातच दुसऱ्या संपाची बीजे रोवली गेली होती अस म्हटलं तर वावगं ठरणार नाही. राज्यातील शेतकऱ्यांची जखम खूप खोल आहे , कर्जमाफी ही त्यावर तात्पुरती मलम पट्टी आणि राजकीय स्कोर सेटल करण्यासाठी मारलेला मास्टर स्ट्रोक असू शकतो पण कायमचा इलाज नक्कीच नाही. परंतु हा प्रश्न सोडवण्यासाठी आजवर कोणत्याही सरकारने ठोस पावलं उचलली नाहीत. मग ते फडणवीस सरकार असेल अथवा याच्या आधीचे कॉंग्रेस राष्ट्रवादी सरकार असेल.
 आजच्या आणि या आधीच्या शेतकरी संपाला न मागता पाठींबा आणि तेवढेच अनाहूत सल्ले देणारे आदरणीय पवार साहेब तब्बल दहा वर्षे सलग केंद्रीय कृषी मंत्री असूनदेखील त्यांनी या प्रश्नाकडे कधी गांभीर्याने पाहिले नाही.  पवारसाहेब आज सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांना जे सल्ले देत आहेत ते त्यांनी त्यांच्या दशकभराच्या कारकिर्दीत का अवलंबिले नाहीत हा प्रश्न राज्यातील तमाम शेतकऱ्यांना पडला आहे.  जर पवार साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले असते तर जनतेने त्यांना इतक्या वाईट पद्धतीने सत्तेबाहेर फेकले नसते. आज स्वतःच्या राजकीय अपरिहार्यतेमुळे शेतकऱ्यांसाठी कळवळून उठणाऱ्या पवारसाहेबांनी सत्ता असताना शेतकऱ्यांवर केलेले अन्याय अत्याचार महाराष्ट्र विसरला नाही.
आज पवारसाहेब आंदोलक शेतकऱ्यांना टोकाची भूमिका घ्यायचा सल्ला देत आहेत, परन्तु २०११ साली साहेब सत्तेत असताना मावळच्या शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घेत रस्त्यावर उतरले तेव्हा यांच्या सरकारने पोलिसांना शेतकऱ्यांवर थेट गोळीबार करण्याचे आदेश दिले. गोळीबाराचा आदेश देताना कोणतीही स्टॅंडर्ड प्रोसिजर फोलो करण्यात आली नव्हती. त्या गोळीबारात ३ शेतकरी मृत्युमुखी पडले आणि दहा शेतकरी गंभीर जखमी झाले हे सांगायला साहेब विसरतात.
शेतकऱ्यांचा एवढा कळवळा असणाऱ्या साहेबांनी गोळीबार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कसलीही कारवाई न करता केवळ एक वॉर्निंग लेटर देऊन मुक्तता केली.
साहेबांनी शेतकऱ्यांवरच प्रेम दाखवण्याची एकही संधी कधी सोडली नाही. १९९४ साली साहेब मुख्यमंत्री असताना नागपुरात ‘गोवारी’ या आदिवासी जमातीच्या ४० हजार लोकांचा जमाव आपल्या विविध मागण्यांसाठी विधानभवनावर येऊन धडकला. हिवाळी अधिवेशन सुरु होतं. झाडून सगळे मंत्री नागपुरात होते परंतु एकही मंत्री, सरकारचा प्रतिनिधी निवेदन घ्यायला यांच्याकडे गेला नाही. अशा परीस्थित काय करायचं याची माहिती नसलेल्या सैरभैर झालेल्या जमावावर पोलिसांनी लाठीमार सुरु केला. चेंगरा चेंगरी झाली. शंभराहून अधिक आदिवासी बांधव मृत्युमुखी पडले व पाचशेहून अधिक आदिवासी जखमी झाले. मृतांमध्ये लहान मुलं आणि स्त्रियांची संख्या जास्त होती.
या दुर्दैवी घटनेची नैतिक जबादारी स्वीकारत आदिवासी विकास मंत्रालयाचे तत्कालीन मंत्री मधुकर पिचड यांनी दिलेला राजीनामा वगळता लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कसलीही कारवाई केली नाही. विधानभवनावर अशा प्रकारचा मोर्चा होत आहे याची मला माहिती नव्हती अशी अजब भूमिका तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांनी त्यावेळी घेतली होती. डॅमेज कंट्रोल चा भाग म्हणून मृतांच्या नातेवाईकांना सरकारी नोकरी देण्याची घोषणा सरकारने केली होती, त्याचीही पूर्तता करायला साहेबांच्या सरकारला वेळ मिळाला नाही.
आज शेतकऱ्यांना टोकाची भूमिका घ्यायचा सल्ला देणाऱ्या पवार साहेबांनी त्यांच्या सत्ता काळात टोकाची भूमिका घेणाऱ्या शेतकऱ्यांना कशा प्रकारची वागणूक दिली आहे हे महाराष्ट्रातला बळीराजा कधीच विसरू शकणार नाही.